भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

नावात काय आहे?… अबब !मुक्ताईनगर विधानसभेत एकाच नावाचे ३-३ उमेदवारांची लाट, मतदारांचा गोंधळ उडणार ?

मुख्य संपादक– भानुदास भारंबे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क

नावात काय आहे? मुक्ताईनगच्या मतदारांना विचारा, एकाचवेळी ३ चंद्रकांत पाटील आणि ४ रोहिणी रिंगणात

जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक, नाटककार शेक्सपियर यांचं नावं उच्चारलं की लगेच ‘नावात काय आहे?’ हे त्यांचं वाक्य लगेच सर्वांना आठवतं. निवडणुकीच्या रणधुमाळीत नावला खूप महत्त्व आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार हा त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या नावावर मतं मागत असतात. 

निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी प्रमुख उमेदवाराच्या नावाचा अन्य एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघातही यंदा तोच प्रकार घडलाय. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (29 ऑक्टोबर) रोजी संपली. 

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षा ॲड रोहिणी एकनाथराव खडसे आणि शिवसेनेचे चंद्रकांत निंबाजी पाटील यांच्या उमेदवारी अर्ज आहे. पण, दोन्ही प्रमुख उमेदवारांचे नामसाधर्म्य असणाऱ्या  तीन उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन-तीन उमेदवार निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी एकनाथ खडसे यांच्या नावात साधर्म्य असलेले रोहिणी संतोष कवळे (रा. इंदापूर, जिल्हा पुणे), रोहिणी गोकुळ खडसे (रा. बाभुळगाव, जिल्हा अकोला) व रोहिणी पंडित खडसे (रा. नागरतास, ता. मालेगाव, जिल्हा नाशिक) तीन रोहिणी खडसे अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या चंद्रकांत निंबाजी पाटील यांच्या नावाचे साधर्म्य असलेले चंद्रकांत चुडामण पाटील ( रा. मानेगाव ता. मुक्ताईनगर ) आणि चंद्रकांत शिवाजी पाटील ( रा. चिंचखेडा, ता. मुक्ताईनगर ) दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

अपक्ष उमेदवारांना तुतारी आणि धनुष्यबाण साधर्म्य असलेले चिन्ह मिळाल्यास मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

पाचही उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास मतदारांसमोर संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारांना चकवा देण्यासाठी आणि उमेदवारांची मते विभागली जाण्यासाठी ही राजकीय खेळी आहे, अशी चर्चा आता सुरु झालीय. या खेळीचा फायदा कुणाला मिळतो हे निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.  

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!