भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

सरकार कोसळले : अखेर उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा !

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आपल्यासोबत तब्बल 45 आमदार असल्याचा दावा शिंदेनी केला आहे. त्यानंतर मात्र शिवसेनेचे दोन गट स्पष्टपणे दिसून येत होते. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता. शेवटी आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

22 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांना कायदेशीर बाबी करण्यात रस नव्हता. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आजही कॅबिनेट बैठकीपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!