अखेर शिंदे सरकारचे खाते वाटप जाहीर; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळाचं अखेर खातवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
इतर मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे–
1) राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
2) सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
3) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
4) डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
6) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
7) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
8) संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
9) सुरेश खाडे – कामगार
10) संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
11) उदय सामंत – उद्योग
12) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
13) रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
14) अब्दुल सत्तार – कृषी
15) दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
16) अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
17) शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
18) मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास