भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“निजामाची औलाद येते आणि औरंगजेबाच्या पाया पडते” ; “शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो– राज ठाकरे संतापले

पुणे मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा झाली. यावेळी त्यांनी  औरंगजेबच्या औरंगाबाद येथील थडग्यावरून ओवेसी यांच्या औरंगजेब कबर भेटीवर जोरदार समाचार घेतला. औरंगजेबच्या औरंगाबाद येथील थडग्यावरून चाललेल्या राजकारणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेच एमआयएमला औरंगाबाद मध्ये वाढवलं, मोठा केला. या निजामाच्या औलादी इकडे वळवळ करू लागल्या, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. शिवसेनेचा औरंगाबादचा खासदार पडला आणि एमआयएम चा निवडून आला. एमआयएमला भुसभुशीत जमीन शिवसेनेच दिली. आमच्याच महाराष्ट्रात निजामाची औलाद येते. जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्याच्या मनसुब्याने निघाला अश्या औरंगजेबाच्या कबरीवर ते ओवेसी डोकं टेकवतात. मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही. आम्हालाच लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत.

आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात. आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. अस जोरदार टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार.

काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. हे सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाहीये. कारण महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करायचं. अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!