भाजपला राज्यात गोंधळ निर्माण करायचाय– संजय राऊत
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांवर १२ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. भाजपकडून राज्यसभेप्रमाणे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा सहावा अतिरिक्त उमेदवार देण्यात आला आहे. अतिरिक्त उमेदवार देऊन भाजप राज्यात गोंधळ निर्माण करत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
- “तु मला आवडतेस … ” महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग
- मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी महिला सरपंच अवघ्या पाच दिवसात अपात्र …….
- मुक्ताईनगर मध्ये गावठी कट्टा सापडल्याने खळबळ, तरुणाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
राज्यातील राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २० जून रोजी निवडणूक होणार असून भाजपच्या अतिरिक्त उमेदवारामुळे चुरस निर्माण झाली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यातल पैशांचे राजकारण करुन भाजपला गोंधळ निर्माण करायचा आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.
विधान परिषदेच्या १० जागांवर भाजपकडून सहा उमेदवार देण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी २ उमेदवार देण्यात आले आहेत. यामुळे १० जागांवर १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. एका उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांची गरज असून भाजपकडे ११३ तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. यामुळे या निवडणुकीमध्येसुद्धा अपक्षांची मत गेम चेंजर ठरणार आहेत.