उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका : माजी खासदाराचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा !
अमरावती, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेला आणखी एक झटका बसला असून शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे नेतेपदाच्या राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी ईडीने केलेल्या कारवाईवेळी पक्ष नेतृत्वाकडून आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत व्यक्त केली. अडसूळ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- मुक्ताईनगरात निवडणूकीची माहिती न देण्याऱ्या प्रशासनाच्या विरोधात पत्रकारांचा बहिष्कार
सिटी कोऑपरेटिव्ह बँक बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस देखील केली नाही. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हा एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहे. आता अडसूळ यांनी देखील राजीनामा दिला आहे. मात्र आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ एकनाथ शिंदे गटात आधीपासूनच आहेत. त्यामुळे आता आनंदराव देखील त्यांच्यासोबत जावून मिळणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेला उद्धव ठाकरेंना जोरदार हादरे बसत आहेत.
आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून ते निवडून यायचे. परंतु अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. शिवसेनेत नेतेपद ही अतिशय महत्त्वाचे मानले जाते. सध्या शिवसेनेत नऊ जण हे नेतेपदावर आहेत.