शिवसेना म्हणजे गटारातले बेडूक, गिरीश महाजनांनी सेनेला डिवचले
धुळे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : ‘शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली. तसंच, ‘गटरातील बेंडूक’ म्हणून महाजन यांनी शिवसेनेचा (shivsena) उल्लेखही केला. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीमध्ये सभा पार पडली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाजन यांनी उत्तर दिले आहे. त्याचं उत्तर मतदारांनी दिलं आहे. 10 वर्षांपासून देत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मोठा झाला आहे. सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमची युती झाली होती. पण आज काय परिस्थिती आहे.
- सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, कोणत्या देशाने केले फर्मान
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
आम्हाला जनतेनं पाठिंबा दिला सर्वाधिक जागा दिला आहे. मोदींवर यांना बोलण्याची गरज नाही. यांची लायकी आहे. हे गटारतले बेडूक आहात, अशी टीका महाजन यांनी केली. ‘शिवसेना सत्ता लंपट आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून 4 खासदार निवडून आणावे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस ही आमदार निवडून आले नसते’ अशी टीका महाजन यांनी केली.