ब्रेकिंग : बहुमत चाचणी रोखण्याची मागणी, राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात !
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे. पण, आता महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं shivsena सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परिस्थिती जैसे थे ठेवली जावी यासाठी शिवसेना नेते सुनिल प्रभु यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. maharashtra politics
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीला पत्र पाठवले आहे. पण महाराष्ट्र सरकार आणि उपाध्यक्षांचे वकील सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीच्या विरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ३० जून रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत यावर सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने सांगितलं आहे. तो पर्यंत ३ वाजेपर्यंत याबाबतची कागद पत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
राज्यपालांनी अवघ्या काही तासांमध्ये नोटीस बजावली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी हा वेळ अत्यंत कमी आहे. यावेळेत आमदारांना राज्यातून बोलावण्यास वेळ लागणार आहे, असा दावा सेनेनं केला आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून सुनावणी ११ जुलैला होणार आहे. सजर कोणताही राजकीय पेच निर्माण झाला तर आमच्याकडे या असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, त्यानुसार शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे.