भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल; आनंद दिघेच्या बाबतीत घटनांचा मी साक्षीदार, शिंदेंचा इशारा

मालेगांव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर शिवसेना नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आणखीच चिघळू लागले आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असल्याचे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. मी ज्यावेळी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल असा इशारा शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी म्हटले की, आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. रात्र-दिवस शिवसेनेसाठी काम केले. या मेहनतीमधून शिवसेना मोठी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. मग हा विश्वासघात, गद्दारी कोणी आम्ही केली तुम्ही केली असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. धर्मवीर सिनेमा काही लोकांना रुचला नाही. पचला नाही,  मी आज जाहीरपणे बोलणार नाही. आज ज्या मुलाखतीचा सपाटा चालू आहे त्यावरही मी बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. 

शिंदे आज मालेगावात बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शिवसेना पुढे न्यायची आहे. तर आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले आहे. त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला. तुम्ही लढवय्ये आहात, बाळासाहेबांचे नाव तुम्ही उज्ज्वल कराल, असे नरेंद्र मोदी आपल्याला म्हणाल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी म्हटले की, अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावे लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

पंतप्रधानांनी माझे संपूर्ण भाषण ऐकले. मनापासून आपण भाषण केले, असे मोदी म्हणाले, असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आषाढी एकादशीची पूजा करण्यासाठी मी पंढरपूरला गेलो होतो. भाग्य लागते त्यासाठी, असे सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मी स्वत: ला भाग्यवान समजतो. विविध कार्यक्रमांना मी हजर होतो. ज्या ठिकाणी मी गेलो, तेथे रस्त्याच्या दुतर्फा हजारो माणसे होती. हात उंचावून त्यांनी माझे स्वागत केल्याचेही शिंदे यांनी सांगितले. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास त्यांनी दिला, असा दावा शिंदे यांनी केला. तर आम्ही कोणालाही पळवले नाही. आम्ही कोणाचाही विरोध करत नाही, हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!