“राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष”, प्रवीण दरेकरांची जहरी टीका
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा | भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपाचे भाषेचा वापर वाद निर्माण झाला.’गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.
शिरुर मधील लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलत असताना दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी केली. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाहीय. सुभेदार,कारखानदार,बँका,आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा आरोप केला आहे. रामोशी समाजाच्या निमित्ताने आता भाजपच्या एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ असेल आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात उगारली जाईल. राज्यात जिथे जिथे महिला अत्याचार होईल तिथे तिथे हातात कु-हाड घेणार अस दरेकर यांनी सरकारला टोमणा मारला आहे.