डिसेंबरपुर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार – प्रकाश आंबेडकर
मुंबई (वृत्तसंस्था)। महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारने कोविड काळात आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यावर राज्य सरकारने दिलेला नकारात्मक प्रतिसाद यामुळेही केंद्राची राज्याविरोधात नाराजी आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने केंद्राने मंजूरी दिलेल्या कृषी विधेयकांची अंमलबजावणीस विरोध दर्शविला आहे. घटनेनुसार राज्याला केंद्राविरोधात जाता येत नाही. त्यामुळे बिहार निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट अस्तित्वात येईल, असे आंबेडकर म्हणाले आहेत.