भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

‘राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागणार ? यावर राजेश टोपे म्हणतात….

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा | कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र आता रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. देशात आणि राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत ज्याने आता नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट सेप्टेंबरचा महिना म्हणजे सणावारांचा. गेला वर्षभर सणांवर बंदी घालण्यात आली होती, मात्र आता सण साजरे करण्यास परवानगी मिळावी म्हणून नागरिक आक्रमक झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आता सरकारने सण साजरा करू नये असं आव्हान लोकांना केलं आहे, आणि सणांवर निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांमुळे राज्य सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.

केरळ असा एक राज्य होता जिथे सगळ्यात कमी कोरोना रुग्ण होते, मात्र ओणम सणामुळे लोकांनी केलेल्या गर्दीमुळे आज केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे. सुरुवातीला कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याचं चित्र केरळने देशाने दाखवलं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केरळने विषाणूला रोखण्यात यश मिळवलं. कोरोना मृत्यूदरही कमी होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केरळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढलं. ऑगस्ट महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना वाढीला आळा घातल्याचं चित्र असताना केरळमध्ये मात्र कोरोना शमण्याची चिन्हं नाहीत. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केरळमध्ये केवळ तीन टक्के लोकसंख्या राहते परंतु कोरोना रुग्णांच्या बाबतीत हेच प्रमाण व्यस्त आहे. देशातल्या कोरोना रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत. ओणम या सनानंतर केरळ मध्ये जवळ जवळ ३०-५० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली.

केरळ मध्ये जी भयावह परिस्थिती सुरु आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रात पुन्हा येऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. केंद्रानं ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या अधिक प्रमाणात आहे, तिथं नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं नाईट कर्फ्यू आणि इतर सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकार नक्कीच करेल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या बाबी लक्षात ठेऊन राज्याने सणांवर निर्बंध लावले आहेत, आणि नाईट कर्फ्यू बदल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. जर पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर मग पुन्हा राज्याचं आर्थिक नुकसान होईल आणि अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!