भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मजुरी करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ठेकेदारनाने केला बलात्कार

रायगड (वृत्तसंस्था)। रायगड येथे १६ वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदारनाने बलात्कार केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे घडली.

याबाबत गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता पाली पोलीस स्थानकात ठेकेदारा विरोधात बलात्कार, अ‍ॅट्रोसिटी आणि पॉस्को अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आल्याचे सांगितले जात आहे. या ठेकेदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व चौकशी करून शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय आदिवासी मुलगी सध्या पाली येथील डहाणू या बिल्डिंगमध्ये बांधकाम मजुरीचे काम करत होती. तेथील ३४ वर्षीय ठेकेदार नितीन महादू पाटील हा सुद्धा तेथे काम करत होता. ठेकेदाराने १ जानेवारी २०१९ ते ६ ऑक्टोबर २०२० या कालावधीत पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत अल्पवयीन आदिवासी मजूर मुलीवर वारंवार बलात्कार करून जातीवाचक शिवीगाळ करायचा. तसेच या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार पाली पोलीसांनी ठेकेदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याला अटक केले असल्याची माहिती मिळतेय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!