गृहमंत्री अनिल देशमुख व एकनाथराव खडसे यांच्या गुप्त बैठकीने राजकारणात खळबळ
रावेर (प्रतिनिधी)। बोरखेडा येथे हत्याकांड पीडित कुटुंबाची भेट वेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुप्त बैठक झाल्याने जिल्ह्यात अनेक तर्क वितर्कांना पुन्हा उधाण आले आहे .
गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे . आज गृहमंत्री रावेर जवळच्या बोरखेडा येथे जाण्यासाठी जिल्ह्यात आले असता आजच एकनाथराव खडसे हेही बोरखेडा येथे जात असल्याचे समजल्यावर राजकीय चर्चेला उधाण आले . काही जाणकारांच्या अंदाजानुसार या भेटीचे कारण बरेच काही सांगून जाते, दोन्ही नेत्यांनी रावेरच्या विश्रामगृहात अर्धा तास चर्चा केली या वेळी दोन्ही नेत्याशिवाय इतर कोणीही नव्हते . ही भेट पूर्वनियोजित नसल्याने कुणालाच याबाबत पूर्वकल्पना नव्हती . देशमुख आणि खडसेच्या भेटीतून काही नवे घडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
प्रत्यक्ष भेटीतही या दोन्ही नेत्यांशिवाय अन्य कुणी हजर नव्हते त्यामुळे आता या गुप्त चर्चेबद्दल जिल्ह्यात नव्याने चर्चा सुरु झालेली आहे . जिल्ह्यातील राजकारणाचे आडाखे बदलणाऱ्या या हालचालींमुळे सामान्यांचीही उत्सुकता वाढली आहे .