ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता ? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्ला !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव/मुक्ताईनगर, प्रतिनिधी : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय निवडणुक होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्दयावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. यात आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा भाजपला कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना कळवळा कुठे गेला होता असा सवाल करत राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार हल्ला चढवत भाजपावर टीका केली आहे.
ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले असताना आता राज्यातील ५ जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. या सर्व जागांवर भाजपकडून ओबीसी उमेदवार देऊन निषेध करु असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल केला आहे. आता गळा काढण्यात अर्थ नाही असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021
राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जेव्हा भाजपमध्ये होते त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंना त्रास दिला. पक्षातच मुस्काटदाबी सुरु झाल्यानं एकनाथ खडसेंचे मानसिक खच्चिकरण करण्यात आलं शेवटी खडसेंनी भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जाहीर सभेत देवेंद्र फडणवस यांनी त्रास दिला असल्याचे सांगितले आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचे नेतृत्व होते यामुळे रोहिणी खडसेंनी फडणवीसांवर तोफ डागली आहे.