महाराष्ट्र हादरला : शरीरसुखास नकार दिल्याने विवाहितेचा खून करून मृतदेहावर बलात्कार, अमानवीय घटनेने संताप
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातून एक महाराष्ट्र हादरविणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या हुडकेश्वर भागात ही अमानवीय घटना घडली आहे. शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्याने विवाहितेचा गळा दाबून तिची हत्या करून मृतदेहावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने मात्र महाराष्ट्र हादरला आहे.
रोहित गणेश टेकाम, वय. २५, रा. पारशिवनी. या तरुणाने नागपूरच्या हुडकेश्वर भागातील एका ३३ वर्षीय महिलेचा गळा दाबून महिलेवर तिचा खून केला, त्या नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतील घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.
पोलिसही चक्रावले
शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी रोहित टेकाम नामक आरोपीला अटक केली असून आरोपी रोहित टेकाम याने गुन्हा कबूल केला आहे. आरोपी हा मृतक महिलेच्या कुटुंबाशी परिचित होता. दरम्यान याबाबत आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर अत्याचार केल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले. आरोपीने केलेल्या सदरील घटनक्रम ऐकून संतापजनक आणि घृणास्पद कृत्य पाहून पोलिसही चक्रावले.

हुडकेश्वर खुर्दमधील आनंदनगरात ३३ वर्षीय महिला पती व १० वर्षाच्या मुलीसह राहत होती. गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी महिलेचा पती हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी गेला तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळी महिलेला तिच्या ओळखीचा युवक आरोपी रोहितचा कॉल आला. तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले. रोहित तिच्या घरी गेल्यानंतर तिने आरोपी रोहितला दारूची बॉटल आणण्यास सांगितले. दोघांनी सोबत दारू घेतली. रोहितने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्याला विरोध केल्यामुळे आरोपी रोहितने तिला धक्का देऊन खाली पाडले. महिलेच्या कानातून रक्त येत असल्यामुळे तिने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे घाबरून आरोपी रोहित तेथून पळून गेला.
काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी रोहितला आपला मोबाईल महिलेच्या घरात विसरल्याचे समजल्यामुळे तो पुन्हा महिलेच्या घरी गेला. रोहित पुन्हा आल्याचे पाहून महिलेने पुन्हा आरडाओरड सुरू केली. त्यामुळे आरोपी रोहितने ओढणीने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी रोहितच्या मनातील राक्षस जागा झाला. तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.