दहावी, बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन, परीक्षा केंद्रावर द्यावा लागणार पेपर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीच्या विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर जाऊन बोर्डाचा पेपर द्यावा लागणार आहे. सध्या ऑनलाईन परीक्षेस बोर्ड अनुकुल नसल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा प्रश्न असल्याचे बोर्डाचे मत आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा आणि प्रक्टिकल पुढच्या महिन्यांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे वाढते रुग्णसंख्या लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने आढावा घेतला. त्यावेळेस ऑनलाईन परीक्षा घेऊन शकतो का? यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान बोर्डाने परीक्षा घेण्यासाठी आपण पूर्णपणे तयार झाल्याचे स्पष्ट केले. पण ऑनलाईन परीक्षा घेतली तर ग्रामीण विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. कारण ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या आहे. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा ही ऑफलाईनच होणार आणि परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार, अशी भूमिका बोर्डाने घेतली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार
दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.