गुटखा विक्रेत्यांवर महाराष्ट्रात कडक कारवाई होणार– अन्न व औषध प्रशासन मंत्री
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, मुंबई।
महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्रिक्रीला आळा घालण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून कडक कारवाई होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्रिक्रीला बंदी असूनही बेकायदेशीर पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. मात्र आता गुटखा विक्री करणाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. 2012 पासून गुटखाजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र राज्यात सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत एका आरोपीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी विरोध करत उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली. दरम्यान, याचिकेवर सुनावणी देत सर्वोच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीविरोधात कलम 188 व 328 लावणे आवश्यक असल्याचे सांगून उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंड पीठाने दिलेला निर्णय रद्द केला आहे, निर्णयाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्रिक्रीला बंदी असूनही बेकायदेशीर विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आता गुटखा विक्री करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा, अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ सोबतच कलम ३२८ लावता येणार. #गुटकाबंदी @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/pdJJpTwXxe
— Dr.Rajendra Shingne (@DrShingnespeaks) January 9, 2021