भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने विद्यार्थिंनीची आत्महत्या

कराड (वृत्तसंस्था): कोरोना काळात सध्या सर्वत्र ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. कराड तालुक्यातील ओंड इथं दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिंनीकडे ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक असे की, सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षण हे ऑनलाईन पध्दतीने चालू आहे, परंतु साक्षीकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाइल नव्हता. मोबाइल नसल्याने तिला शाळेतील शिक्षकाचे वर्गही जॉईन करता येत नव्हते. अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई कामानिमित्त बाहेर गेली असताना साक्षीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. साक्षीच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. साक्षीचे वडील आबासो बाळकू पोळ यांचा 2007 साली मृत्यू झाला होता. त्यामुळे वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कष्ट करून उदरनिर्वाह करीत आहेत. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!