भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईममहाराष्ट्र

संतापजनक; कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेतल्याचा घृणास्पद प्रकार उघड !

मुंबई : अमरावतीमधील बडनेरा येथे संतापजनक प्रकार घडला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेतल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी टेक्निशियनला अटक केली असून बलात्कारासह विविध कमलांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी अमरावती येथे आपल्या भावाकडे राहते. येथील एका मॉलमध्ये ही तरुणी काम करते. काही दिवसांपूर्वी याच मॉलमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यात आली. या पीडित तरुणीची 28 जुलै रोजी ट्रामा केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्यात आला. मात्र आरोपी अशोक देशमुखने रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून यरिन तपासणी करावी लागेल, असे तरुणीला सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणी आपल्या एका महिला सहकाऱ्यासह तेथे पोहचली. त्यांनी महिला कर्मचारी नाही का? असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगत स्वत: तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले. तरुणीला गुप्तांगातील स्वॅब टेस्टवर संशय आला, म्हणून तिने डॉक्टरांकडे याबाबत चौकशी केली. डॉक्टरांनी अशी कोणतीही चाचणी घेतली जात नसल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!