भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

जिम, ब्युटी पार्लर्स सुरू ठेवता येणार, सुधारित नवी नियमावली जारी !

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉन रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा काल, शनिवारी केली. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार, जिम, ब्युटी पार्लर्स उद्यापासून बंद करण्याचा आदेश दिला होता. परंतु आता ठाकरे सरकारने या आदेशात दुरुस्ती करून सुधारित आदेश जारी केला आहे. या नव्या सुधारित आदेशात जिम, ब्युटी पार्लर्स मिनी लॉकडाऊन दरम्यान सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

राज्य सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. संबंधित कडक निर्बंध आज रात्री बारावाजेपासून राज्यभरात जारी होतील. संबंधित नियमावली शनिवारी (8 जानेवारी) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राज्य सरकारकडून जारी करण्यात आली होती. या नियमावलीमध्ये सलूनसाठी (Salon) 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. पण ब्यूटी पार्लर (Beauty Parlor) आणि जीम (Gym) यांना पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याबाबत राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने सलूनसारखंच ब्यूटी पार्लर आणि जीमला देखील 50 टक्के क्षमतेने अटी-शर्तींच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

जिम, ब्युटी पार्लर्स पूर्णतः बंद करण्याचे आदेश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. कारण यापूर्वी राज्यातील पहिला, दुसऱ्या लाटेदरम्यान जिम, ब्युटी पार्लर्सचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ठाकरे सरकारने आता आपल्या नव्या आदेशात सुधारणा करून जिम आणि ब्युटी पार्लर्सना दिलासा दिला आहे. जिम, ब्युटी पार्लर्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. फक्त लसीचे दोन डोस झालेल्या कर्मचारी आणि व्यक्तींना जिम आणि ब्युटी पार्लर्समध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. तसेच यावेळी मास्क शेवटपर्यंत वापर करणे बंधनकारक असणार आहे. खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार शॉपिंग मॉल्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार नाट्यगृह आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार दोन्ही डोस घेतलेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास मुभा सलून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!