भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यातील काही नेते अस्वस्थ मुख्यमंत्र्यांनी फिरायला हवे, शरद पवार यांचा सल्ला !

मुंबई (वृत्तसंस्था)। महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात फिरायला हवे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत.

धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतच आहे. तसेच निर्णय घेताना ते सर्व सहकार्‍यांनाही विश्वासात घेतात. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काही वाद नाही. परंतु त्यांनी थोडे फिरायलाही हवे, असे पवार म्हणाले. काही दिवसांपासून मुख्यमंत्री हे केवळ मातोश्रीवर बसूनच काम करत आहेत. तसेच राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीवरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख यांना बाहेर फिल्डवर काम करण्याची गरज असल्याचंही शरद पवार म्हणाले.

निमंत्रण मिळाले तरी भूमिपूजनाला जाणार नाही 
सध्या देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!