आरोग्यमहाराष्ट्र

Breaking । उद्या पासून राज्यात संचारबंदी लागू; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (प्रतिनिधी)। महाराष्ट्रात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आल्या नंतर आता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयात बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु बेडची कमतरता निर्माण झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन तयार करण्यास खूप दिवस लागत आहेत. राज्यात होणाऱ्या तुटवड्यावर लवकरच मात करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वाढत्या कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही दिली होती. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत तसेच शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु कोरोनाला रोखण्यासाठी ८ ते १४ दिवस कडक निर्बंध लागू करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करत नाही आहोत परंतु अत्यावश्यक सेवांसाठी या वाहतूक सेवा सुरु राहणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

हवाई वाहतूक, रेल्वे सेवा सुरू राहणार

सेबी, पेट्रोलियन, आयटी कार्गो सेवा सुरू राहणार

कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्येच कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी

हॉटेल्स बंद राहणार, होम डिलिव्हरी सुरू

पार्सल सेवा सुरू राहणार

अति आवश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू राहणार

अत्यावश्यक आणि योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

अनावश्यक ये-जा बंद

15 दिवस संचारबंदी लागू राहणार

उद्या संध्याकाळपासून राज्यात संचारबंदी लागू

उद्या रात्री 8 वाजल्यापासून कठोर निर्बंध

येत्या दिवसांत पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, हे मतदान झाल्यावर तेथेही कठोर निर्बंध लागू होणार

कडक पावलं उचलण्याची वेळ आली आहे

नाईलाजाने काही बंधनं घालावी लागणार

निवृत्त डॉक्टर आणि नर्सेसला मदतीचं आवाहन

राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन, राजकारण करू नका

राज्यात लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे

लस दिल्यानंतर प्रतिकारकशक्ती येण्यासाठी काही दिवस जावे लागतात

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे

हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे

राज्यात ऑक्सिजनची आणखी गरज लागणार

इतर राज्यांतून ऑक्सिजन मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे

राज्यातील एकही रुग्ण आणि मृत्यू लपवलेला नाहीये

सध्याची वेळ निघून गेली तर परिस्थिती आणखी बिकट होईल

राज्यात सध्या 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचा रुग्णांसाठी वापर

राज्यात बेड्स मिळत नाहीयेत, ऑक्सिजनचा आता तुटवडा निर्माण होऊ लागला आहे, रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा निर्माण होत आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सुविधांवर भर पडला आहे

राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे

कोरोनामुळे परिस्थिती भयंकर झाली आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

क्षमतेपेक्षा अधिक भार पडल्याने चाचण्यांचे अहवाल येण्यास उशीर होतोय

कोरोना विरुद्धच्या लढाईला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे

राज्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ रुग्णांची संख्या वाढत नाहीये तर यावेळी कोरोना बाधित मृतकांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. एकूणच राज्यातील परिस्थिती पाहता आणि कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला लॉकडाऊनचं पाऊल उचलावं लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!