‘उद्धवजी, कायदा-सुव्यवस्था बिघडतेय, विशेष अधिवेशन बोलवा’– राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे. इतकंच नाही तर राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. साकिनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन घ्यावे अशा प्रकारचे सूचना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यपालांनी अधिवेशन घेण्याची सूचना दिली आहे. राज्यात आणि मुंबईत दोन ठिकाणी मगाील काही दिवसांत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मुंबईत दहशवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रश्नांवर विधानसभेच चर्चा करण्यात यावी अशी सूचना राज्यपालांनी दिली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी कोणत्या सूचना केल्या आहेत. ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दोन दिवसांचे आधिवेशन घेण्याची सूचना दिली आहे. राज्यापालांच्या सूचनेनंतर राज्य सरकार आणि राज्यपाल पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी सही केली नसल्यामुळे याआधीच राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. तर आता महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोन दिवसीय विधानसभा अधिवेशन घेण्याचा सल्ला दिल्यामुळे पुन्हा राज्यपाल आणि राज्य सरकार आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
राज्यपालांचं यापूर्वीचं पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी जून 2021 मध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवण करुन दिली होती. पाच आणि सहा जुलैला विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात राज्यपालांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्यांच म्हणत योग्य कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते.