महाराष्ट्र

Lata Mangeshkar : गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड, देशावर शोककळा

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान पार्श्वगायिका म्हणून, लता मंगेशकर यांनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये 30,000 हून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘अजीब दास्तान है ये’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘नीला अस्मान सो गया’ आणि ‘तेरे लिए’ सारख्या अनेक संस्मरणीय गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!