महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : महायुतीचे अमोलदादा जावळे यांच्या प्रचाराचा उद्या फैजपूर येथून भव्य शुभारंभ
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे तरुण उमेदवार मा. श्री. अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ ४ नोव्हेंबर २०२४ रोजी फैजपूर येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूर या ऐतिहासिक ठिकाणावर होणार आहे. प्रचाराची सुरुवात सकाळी ९.३० वाजता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीश महाजन, आणि पाच लाडक्या बहिणींच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या उद्घाटनानंतर, फैजपूर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
स्थळ: श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूर
वेळ: सकाळी ९.३० वाजता
विशेष उपस्थिती: रक्षा खडसे (केंद्रीय मंत्री), गिरीश महाजन (राज्य मंत्री)
उद्घाटनानंतर: फैजपूर शहरात प्रचार रॅली
रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना या ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.