प्रफुल्ल लोढा यांच्या सारख्या दारुड्याच्या आरोपांना भीक घालणार नाही – मा.मंत्री एकनाथराव खडसे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगांव (प्रतिनिधी)। भोसरी येथिल भूखंड खरेदी प्रकरणी ईडी ने पाठवलेली नोटीस मला मिळालेली असून आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे तसेच प्रफुल्ल लोढा सारख्या दारुड्याच्या आरोपांना भीक घालणार नसल्याचा घणाघात आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुक्ताई बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत केला.
काल 25 रोजी जामनेर येथील उद्योजक प्रफुल्ल लोढा यांनी माजी मंत्री गिरीश महाजनांवर गैरकृत्याचा आरोप केल्या नंतर अचानक पणे त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे व जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी या दोघांनी आर्थिक अन्वेषण विभागाची दिशाभूल करीत मुंबई येथील माझे घर लोढा भवन व माझे मित्र कोचुरे यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यास सांगितले असा आरोप लोढा यांनी केला त्या आरोपाला माजी मंत्री खडसे यांनी पत्रपरिषद घेत प्रतिउत्तर दिले.
पत्रकार परिषदेत खडसे म्हणाले की,भोसरी येथील भूखंड प्रकरणी मला ईडी ने नोटीस पाठवली असून ती मला मिळाली आहे चौकशी साठी ३० डिसेंबर रोजी मी हजर राहणार असून ईडी ला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.तसेच काल प्रफुल्ल लोढा यांनी केलेल्या टिकेवर त्यांनी थेट उत्तर न देता आपण कोणत्याही दारुड्या व्यक्तीने केलेल्या आरोपांना भीक घालत नसल्याचेही या वेळी खडसेंनी स्पस्ट केले.