भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ठाकरे-शिंदे वादाच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; वाद रेंगाळणार

मुंबई, मंडे टू मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा लांबणीवर पडली आहे. या सत्ता संघर्षचा फैसला आणखी दहा दिवस लांबणीवर गेला आहे.२२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष रेंगाळणार अशी चिन्हे आहेत. १२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी पार पडणार होती. (Shinde-Thackeray news)

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 12 ऑगस्ट रोजी होणारी सुनावनी आता थेट 22 ऑगस्टला होणार. या सत्ता संघर्षचा फैसला आणखी दहा दिवस लांबणीवर गेला आहे. यापूर्वी दोन वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे.खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कुणाकडे जाणार यावर हा सुनावणीनंतर निर्णय होणार आहे. महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी  होत आहे. सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर उदय लळीत यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. यामुळे सुरुवाती पासून हे प्रकरण हाताळत असलेले सरन्यायाधीश रमणा  ही याचिका मार्गी लावतात की उदय लळीत यांच्याकडे हे प्रकरण जाते हे 22 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणी नंतरच स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!