भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

Breaking : राज्यातील दीड लाख बालक कोरोनाच्या विळख्यात

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)।राज्यात ० ते १० वयोगटातील कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख ५१ हजार २९५ बालके कोरोनाबाधित झाली असल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. प्रौढ आणि लहान मुलांमधील कोरोना उपचारपद्धती आणि प्रोटोकॉल वेगवेगळा असून त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला हा टास्क फोर्स देणार आहे.गेल्या मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेत वेगवेगळ्या वयोगटातील नागरिक बाधित झाले आहेत. ३१ ते ४० वर्षे वयोगट सर्वाधिक बाधित असून त्यापाठोपाठ ४१ ते ५० या वयोगटातील कोरोनाबाधितांचे प्रमाण आहे; तर २१ ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण तिसऱ्या क्रमांकावर आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण ३.०५ टक्के आहे.

इतर वयोगटातील नागरिकांच्या बाधितांपेक्षा बालकांचे प्रमाण कमी असले, तरी बालकांना उपचारादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच त्यांच्यावर प्रौढांप्रमाणे उपचार करता येत नाहीत. त्यामुळे पुढील भीती लक्षात घेता बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. कोणत्याही आजाराच्या उपचारामध्ये प्रौढ आणि बालकांचा प्रोटोकॉल वेगवेगळा असतो. लहान मुलांची औषधे वेगळी असतात. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.असे डॉ. अविनाश सुपे, सदस्य, कोव्हिड टास्क फोर्स यांनी सांगितले.
राज्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण ,वयोगट बाधित टक्केवारी
० ते १० १,५१,२९५ ३.०५
११ ते २० ३,४३,४६१ ६.९३
२१ ते ३० ८,७९,४२७ १७.७५
३१ ते ४० ११,०२,९०६ २२.२६
४१ ते ५० ८,८७,७९१ १८.२१
५१ ते ६० ७,४२,६३६ १४.१९
६१ ते ७० ५,१०,९७३ १०.३१

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!