भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

” अनंत चतुर्दशी ” गणेश विसर्जनाचा मुहूर्त आणि विधी

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन होणार आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे.  हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. कुठलेही शुभ विधी किंवा कार्यक्रमापूर्वी गणपतीला वंदन केले जाते. आशा या प्रथम पूजनीय गणपतीच्या उत्सवाचा उद्या शेवटचा दिवस आहे. भक्त  १० दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि ११ व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात. गणपतीचे विसर्जन योग्य पद्धतीने केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते, अशी मान्यता आहे. अनंत चतुर्दशी कधी आहे आणि गणपती विसर्जनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे याबद्दल जाणून घेऊया.

मुहूर्त
राहुकालात करू नये विसर्जन  

अनंत चतुर्दशीला विसर्जन शुभ मुहूर्तावरच करावे. राहुकाळात गणपती विसर्जन करू नये.

पहाटेचा मुहूर्त : ६.०५ ते १०.४५ पर्यंत
दुपारचा मुहूर्त : १२.१८ ते १.५२ पर्यंत
सायंकाळी मुहूर्त : ५.०० ते ६.३१ पर्यंत
रात्रीचा मुहूर्त: ९.२६ ते १०.५२ पर्यंत

विसर्जनाचा पूजा विधी
विसर्जन हा बाप्पाचा निरोपाचा दिवस. बाप्पाला थाटामाटात निरोप दिला जातो. विसर्जनासाठी लाकडी पाटावर प्रथम पिवळे किंवा लाल कापड पसरून त्यावर स्वस्तिक बनवावे. त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. बाप्पाच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. फळे व फुले अर्पण करून मोदक मोदकाचा नैवैद्य दाखवावा. बाप्पाची आरती करावी. गणपतीची मूर्ती आणि पूजेशी संबंधित गोष्टींचे आदरपूर्वक विसर्जन करावे. यानंतर बाप्पा पुढच्या वर्षी येवो, अशी प्रार्थना करून बाप्पांना निरोप दयावा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!