भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

पुढच्या वर्षी लवकर या,पण पुढच्या वर्षी गणपती बाप्पा साठी “इतके” दिवस अधिक वाट पाहावी लागणार

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत महाराष्ट्रभर गणरायांना निरोप दिला गेला. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या दहा दिवसात गाजणानाच्या गजरात सारी सृष्टी दुमदुमली होती. करोनाचे महासंकट टळल्यापासून पहिल्यांदाच अस्सल महाराष्ट्राच्या उत्साहात यंदा गणेशाचे आगमन, पूजन विसर्जन पार पडले. यंदा बाप्पांना निरोप देताना आतापासूनच भाविकांमध्ये पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे कुतुहूल आहे. पण खरंतर आपण पुढच्या वर्षी लवकरच यायची कितीही सूचना देऊन पाठवणी केली असली तरी २०२३ मध्ये बाप्पाचे आगमन यंदापेक्षा थोडे उशिरा होणार आहे.

२०२३ मध्ये बाप्पा कधी येणार?
हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या मध्यात आपल्या घरी येतील. १९ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे यंदाच्या तारखेनुसार मोजल्यास पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना २० दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत महाराष्ट्रभर गणरायांना निरोप दिला गेला. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या दहा दिवसात गाजणानाच्या गजरात सारी सृष्टी दुमदुमली होती. करोनाचे महासंकट टळल्यापासून पहिल्यांदाच अस्सल महाराष्ट्राच्या उत्साहात यंदा गणेशाचे आगमन, पूजन विसर्जन पार पडले. यंदा बाप्पांना निरोप देताना आतापासूनच भाविकांमध्ये पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे कुतुहूल आहे. पण खरंतर आपण पुढच्या वर्षी लवकरच यायची कितीही सूचना देऊन पाठवणी केली असली तरी २०२३ मध्ये बाप्पाचे आगमन यंदापेक्षा थोडे उशिरा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!