भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोने-चांदीच्या दरात घसरण ; खरेदी साठी आजचा दिवस उत्तम

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. मात्र बुधवारी सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. आज रक्षाबंधन असल्याने सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल असणार आहे त्यामुळे सोने चांदीचे दर महागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज ऐन रक्षाबंधनच्या दिवशी सोने चांदीच्या दर घसरले आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

आज २२ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,३५० रुपये तर २४ कॅरेट साठी ५१,६५० रुपये आहे तर १० ग्रॅम चांदीचा दर ५८७ रुपये आहे

देशात येणार ‘वन गोल्ड वन रेट’ योजना
देशात ‘वन गोल्ड वन रेट’ योजना लागू करण्याची मागणीला जोर धरलाय कारण हेच सोने दिल्लीत दुसऱ्या दराने विकले जाते, नंतर पटण्यात दुसऱ्या दराने. तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत तुम्हाला सोन्याच्या किमतीत मोठी तफावत दिसेल.

सोने तेच आहे आणि सोन्याची शुद्धताही तीच आहे. कारण बंदरातून सोने आयात करुन उतरवले जाते, तेथून वेगवेगळ्या राज्यांत पाठवले जाते. शिपिंग खर्च इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलते. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत समान असते. त्यामुळे येत्या काळात देशात ‘वन गोल्ड वन रेट’ येण्याच्या हालचाली सुरू आहे.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे? २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!