भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

गणेश चतुर्थी; कधी आहे गणेश चतुर्थी? गणेश स्थापना शुभ मुहूर्त व पूजा विधी

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। या वर्षी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट रोजी आहे. गणेश चतुर्थी जवळ आल्याने सर्वांनाच गणपती बाप्पाच्या आगमणाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीपासून १० दिवस मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. १० दिवस गणपतीची स्थापना केल्यानंतर बाप्पांचे विसर्जन केले जाते. वर्षातून एकदा येणाऱ्या या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. याशिवाय बुधवार हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी गणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे. यावेळी हे दोन्ही योग एकत्र आले आहेत. या यावेळी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट रोजी आहे आणि या दिवशी बुधवार आहे. त्यामुळे या चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि व्रत विधी.

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थी तिथी : ३१ ऑगस्ट २०२२ रोजी आहे

उदयतिथीनिमित्त गणेश चतुर्थी व्रत ३१ ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी ११:०५ ते १:३८पर्यंत आहे. तर ०९ सप्टेंबर २०२२ रोजी गणेश विसर्जन होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात बाप्पाची स्थापना करून त्याची विधीवत पूजा वगैरे केल्याने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. गणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. ढोल-ताशांच्या गजरात घराघरात गणपती विराजमान केला जातो. दहा दिवस बाप्पांची अतिशय उत्साहाने पूजा केली जाते. गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी गणेश चतुर्थीला सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. यानंतर चौरंगावर लाल वस्त्र टाकून त्यावर गणेशमूर्तीची विधीवत स्थापना करावी. त्यानंतर बाप्पाला अक्षता, दुर्वा, फुलं, फळं अर्पण करावे. प्रसादात बाप्पांचा आवडता नैवद्य मोदक ठेवावा आणि श्री गणेशाची आरती करावी.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!