भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राशीभविष्य : आज शनिवार १३ जानेवारी २०२४. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. दीर्घकाळापासून जाणवणारी समस्या आज सुटेल

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शनिवार १३ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष (Aries) :
भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. समाजात चांगली प्रतिमा तयार होईल आणि त्यामुळे लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. वैवाहिक जीवनातील समस्या आज दूर होतील. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण असेल. तुमची मुलं कुटुंबातील सदस्यांसोबत मौजमजा करतील. कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रतेनं कठोर परिश्रम करावे लागतील. तरच परीक्षेत यश मिळू शकतं.आजचा दिवस तुम्हाला आनंद देणारा असेल.

वृषभ (Taurus) :
प्रेम जीवनात तुमच्या इच्छा जोडीदाराशी शेअर कराल. त्यावर जोडीदार तुम्हाला काही सल्लाही देईल.आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. कुटुंबातील सदस्याबरोबर शॉपिंगला जाताना तुमची आर्थिक स्थिती लक्षात घ्या अन्यथा पैसे जास्त खर्च झाल्याने आर्थिक विवंचना जाणवू शकते. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत रोमांचक क्षण एंजॉय कराल. नवविवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात एखादी चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. विद्यार्थ्यांना आज ज्येष्ठ व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini) :
तुमचा आजचा दिवस संमिश्र जाईल. मुलांच्या भविष्यासाठी पैशाची गुंतवणूक कराल. यासाठी जोडीदाराशी सल्लामसलत करून मुदत ठेवी किंवा विमा पॉलिसीत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. पैसे उधार दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मनात आलेल्या कल्पनेवर लगेच काम सुरू करावं, तरच नफा कमवता येईल. मात्र या कल्पना दुसऱ्याशी शेअर केल्यास त्याचा फायदा त्यांना होईल. संध्याकाळी पालकांबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकता.

कर्क (Cancer) :
चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसाठी मनापासून संवाद साधाल. त्यामुळे मनावरचं ओझं कमी होईल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. प्रेम जीवनात ऊर्जादायी वाटेल. संध्याकाळचा वेळ आई-वडील, भावंडांबरोबर घालवाल. तुमची नाराजी यामुळे दूर होऊ शकता. आज तुमचे कुटुंबीय तुमच्यासाठी पार्टीचं नियोजन करू शकतात तसंच भेटवस्तूही आणू शकतात.

सिंह (Leo) :
मुलांमुळे निराशेचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. व्यवसाय थंडावला असेल आणि त्याच्यासाठी बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अजून काही काळ वाट पाहणं योग्य ठरेल. अन्यथा कर्जाची परतफेड अशक्य होईल. व्यवसायात कोणतंही काम सल्लामसलतीने करू नका अन्यथा सल्ला देणारे तुमचं काम रोखून धरण्याचा प्रयत्न करू शकतात. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या नातेवाईकाच्या घरी शुभ कार्यासाठी जाऊ शकता.

कन्या (Virgo) :
आजचा दिवस राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी चांगला आहे. कारण तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला मानसन्मान मिळू शकतो. तसंच राजकीय प्रयत्नांनादेखील यश मिळू शकतं. जोडीदाराकडे नवीन व्यवसायाबाबत चर्चेचा विचार करू शकता. पण यासाठी तुमच्या भावाशी सल्लामसलत करून पुढे जा. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील तरुण मुलं काही मागण्या मांडू शकतात, त्या तुम्ही पूर्ण कराल.

तूळ (Libra) :
जुन्या जबाबदाऱ्या दूर होतील. त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. दिवस गुंतागुंतीचा असेल. व्यवसायातील समस्या सोडवण्यात पूर्ण दिवस जाईल. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही. आज तुमची आई तुमच्यावर नाराज होऊ शकते. ती नाराज झाल्यास तिची समजूत काढा. डोकेदुखी, ताप यासारखे आजार होतील. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

वृश्चिक (Scorpio) :
आजचा दिवस सामान्य असेल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. पण हा खर्च करताना उत्पन्न लक्षात घ्यावं अन्यथा भविष्यात आर्थिक विवंचना जाणवू शकते. त्यामुळे भविष्यासाठी बचत करणं योग्य ठरेल. विवाहयोग्य व्यक्तींसाठी चांगले प्रस्ताव येतील आणि प्रस्तावाला कुटुंबीयांकडून त्वरित मान्यता मिळू शकते. एखादा जुना मित्र भेटल्याने नाराजी दूर होईल.

धनू (Sagittarius) : आज व्यवसायात उत्पन्नाचे विविध स्रोत मिळतील. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या वडिलांना तुमच्या भावंडांकडून भेटवस्तू मिळू शकते. परदेशी व्यक्तींबरोबर व्यवसाय करणाऱ्या लोकांना निराशाजनक बातमी समजू शकते. अर्थात त्यामुळे चिंता वाढू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पगारवाढीची बातमी ऐकायला मिळेल. मुलाची प्रगती पाहून आनंद वाटेल. संध्याकाळी जोडीदाराबरोबर बाहेर खरेदीला जाऊ शकता.

मकर (Capricorn) :
आजचा दिवस तुमच्या साठी आनंददायी असेल. घरात कुटुंबासोबत आनंदाचे क्षण एंजॉय कराल. कारण एखादी दीर्घकाळापासून जाणवणारी समस्या आज सुटेल. संध्याकाळी घरी पाहुणे येऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य व्यस्त राहतील. पण कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने धावपळ करावी लागेल. त्यासाठी खर्च देखील होईल. सासरकडच्या व्यक्तीशी असलेला वाद जोडीदाराच्या मदतीने सुटेल.

कुंभ (Aquarius) :
आजचा दिवस नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी चांगला आहे. पण अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच पावलं टाकणं फायद्याचं ठरेल. व्यवसायाच्या ठिकाणी नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात. त्यांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटू शकतो. सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभागी व्हाल. त्यामुळे कुटुंबीयांना देखील आनंद वाटेल. वडिलांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. त्यामुळे तुमचा फायदा होईल. कधीकधी मोठ्यांचं ऐकणं चांगलं असतं.

मीन (Pisces) :
कुटुंबातील एखाद्या तरुण सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते.व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशासंबंधी प्रलंबित समस्या सुटतील. खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा अन्यथा पोटाशी संबंधित समस्या जाणवतील आणि यामुळे पुढे एखादा मोठा आजार उद्भवू शकतो. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेनं परीक्षेची तयारी केल्यास त्यांना यश मिळेल. संध्याकाळी उत्पन्नातला काही भाग गरीबांना दान कराल. यामुळे मानसिक शांती लाभेल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!