राशीभविष्य : आज रविवार १४ जानेवारी २०२४.आत्मविश्वास वाढेल,निर्णयक्षमता सुधारेल,संपत्तीत वाढ होऊ शकते,सावधगिरी बाळगा, समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल.
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज रविवार १४ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष (Aries) : आज दिवसभरात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे चिंतेत राहाल. एखाद्या स्त्रीमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो; पण वादात पडणं टाळावं. सहलीला जाण्याची तयारी करणं फायद्याचं ठरेल. मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न कराल. संध्याकाळी हुशारी आणि समजूतदारपणाच्या जोरावर निर्णय घ्याल. हा निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमजीवनात एखाद्या नातेवाईकाकडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य मिळेल. त्यामुळे अभ्यासातल्या अडचणींवर मात करू शकाल.
वृषभ (Taurus) :
आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. परंतु, नात्यात संयम बाळगावा लागेल. घाईघाईत कोणाताही निर्णय घेणं किंवा कार्यवाही करणं टाळा. अन्यथा अशा गोष्टी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांनी नवीन बिझनेस प्लॅन अंमलात आणला तर त्यातून मोठा नफा मिळू शकतो. संध्याकाळी कुठे तरी बाहेर जाण्याचा बेत आखाल; पण तब्येत बिघडल्याने ते शक्य होणार नाही. तुमचे तुमच्या आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.
मिथुन (Gemini) :
आज वादात पडणं टाळा. अन्यथा भविष्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. घरातल्या सदस्यांमध्ये वाद झाले तर मौन बाळगणं तुमच्यासाठी हिताचं ठरेल. आधीच कोणता आजार असेल आणि त्याचा त्रास वाटत असेल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल अन्यथा भविष्यात आजार बळावू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून वाहवा मिळेल आणि त्यामुळे प्रगतीदेखील होईल. जोडीदाराशी सल्लामसलत करताना बोलण्यात गोडवा ठेवा. असं न केल्यास दोघांमध्ये वाद होऊ शकतात.
कर्क (Cancer) :
आजचा दिवस सामाजिक कार्याशी संबंधित व्यक्तींसाठी चांगला असेल. ज्या व्यक्ती बऱ्याच काळापासून नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. जुनं कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. प्रेमजीवनात कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अद्याप जोडीदाराची कुटुंबीयांशी ओळख करून दिली नसेल तर तुम्ही आज ती करून देऊ शकता. संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राला भेटाल. त्याच्यासोबत कुठे तरी बाहेर जाऊ शकाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात समाधान मानाल.
सिंह (Leo) :
राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. नवीन काम करायचं ठरवल्यास त्यात यश मिळेल. तसंच यासाठी लोकांचादेखील पाठिंबा मिळेल. तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबातल्या सदस्यांसोबत नात्यात तेढ निर्माण होऊ शकते; पण ती लगेच संपुष्टात येईल आणि संबंध सुधारतील. कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याच्या विवाहात अडथळे असतील तर त्यासाठी तुम्ही अन्य व्यक्तीकडून मदत मागू शकता. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल; पण त्याकरिता कठोर परिश्रम आवश्यक आहेत.
कन्या (Virgo) :
दिवस अत्यंत फलदायी असेल. जोडीदाराची प्रगती पाहून आनंद वाटेल. त्यामुळे तुम्ही तिला किंवा त्याला भेटवस्तू देऊ शकता. सर्जनशील कामात प्रगती दिसेल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. मुलांच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त व्हाल. त्यामुळे मनही काहीसं उदास राहील. तुम्हाला त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल अन्यथा त्यांची ही सवय तुमच्यासाठी भविष्यात समस्या निर्माण करू शकते. तुम्ही संध्याकाळचा वेळ आई-वडिलांच्या सेवेत घालवाल. तुमच्या मनातल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर कराल. तसंच तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल.
तूळ (Libra) :
दिवस मध्यम फलदायी असेल. आज तुम्ही आवडत्या व्यक्तीला भेटाल. त्याच्याकडून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल; पण संवाद साधताना गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने आनंद मिळेल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. घरातलं एखादं प्रलंबित काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
वृश्चिक (Scorpio) :
संपत्तीत वाढ होऊ शकते. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यातले मूव्हेबल आणि इम्मूव्हेबल पैलू बारकाईनं तपासून घ्यावेत. अन्यथा तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित सरकारी काम आता विनाविलंब पूर्ण होईल. अन्य व्यक्तींच्या व्यवसायात ढवळाढवळ करणं टाळा. नाही तर तुम्हाला त्यांच्याबद्दल बरी-वाईट बातमी ऐकायला मिळू शकते. कोणंतही काम संयमानं केलं तर त्यात यश मिळेल.
धनू (Sagittarius) :
निर्णयक्षमता सुधारेल. घर किंवा व्यवसायाशी संबंधित निर्णय घ्यायचा झाल्यास तो बुद्धीनं आणि विवेकानं घ्या. कोणाच्या तरी प्रभावाखाली निर्णय घेणं टाळा. अन्यथा नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. आई-वडिलांच्या आशीर्वादाने नवीन व्यवसाय सुरू कराल. त्यात यशदेखील मिळेल. विद्यार्थ्यांनी एखादी परीक्षा दिली असेल आणि तिचा निकाल आज लागला तर तो उत्तम असेल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला नाही. त्यामुळे नवीन लोकांना भेटणं शक्यतो टाळावं.
मकर (Capricorn) :
दिवस मध्यम फलदायी असेल. जोडीदाराकडून पाठिंबा आणि साहचर्य मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याविषयी एखादा निर्णय घेणार असाल तर त्याबाबत जोडीदार आणि तुमच्या पालकांशी सल्लामसलत करून घ्या. नाही तर भविष्यात अडचणी येऊ शकतात आणि तुमच्यावर टीका होऊ शकते. नोकरदार व्यक्तीची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. त्यामुळे तुमचा कामाचा उत्साह आणखी वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. घरगुती वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च कराल; पण खर्च करताना उत्पन्न लक्षात घ्यावं अन्यथा भविष्यात आर्थिक विवंचना जाणवू शकते.
कुंभ (Aquarius) :
तुमचा आत्मविश्वास वाढेल. कोणतंही काम उत्साहानं पूर्ण कराल. तुम्ही व्यवसायातल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल आणि ते तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. प्रत्येक बाबतीत कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. सल्ल्याची गरज भासल्यास भावा-बहिणींसोबत जरूर चर्चा करा. त्यामुळे तुमचं नातंदेखील सुधारेल. आर्थिक बाबींसाठी केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. कोणत्याही व्यक्तीसोबत पैशांचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अन्यथा गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
मीन (Pisces) :
दिवस कौटुंबिक जीवनासाठी आनंदाचा असेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्यात यश मिळू शकतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबात बऱ्याच काळापासून असलेला कलह संपुष्टात येईल. कौटुंबिक ऐक्य वाढेल. व्यावसायिकांनी कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी संपूर्ण गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे, अन्यथा फसवणूक होऊ शकते तसंच समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायात गुंतवलेले पैसे गमवाल. त्यामुळे सावधगिरी बाळगा.