भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

राशीभविष्य : आज सोमवार ८ जानेवारी २०२४,अरेरावीची भाषा करू नका.व्यवहारात सावध राहा, रागावर ताबा ठेवा. यश मिळेल

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार ८ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष –
हव्या असलेल्या व्यक्तीची भेट होईल. त्यांच्यासाठी वेळ, पैसा, खर्च कराल. घरातील वरिष्ठांची काळजी घ्या.

वृषभ –
आजचे काम उद्यावर टाकू नका. कोर्टाच्या कामात मदत मिळेल. जुना मित्र भेटेल. धंद्यात नवे काम मिळेल.

मिथुन –
धंद्यात ग्राहकांबरोबर गोड बोला, वाद घालू नका. अरेरावीची भाषा करू नका. संयमाने मार्ग निघेल.

कर्क –
महत्त्वाचा फोन आल्याने उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. योग्य सल्ला घेता येईल.

सिंह –
मोठी खरेदी करण्याचे ठरवाल. धंदा वाढवा. थकबाकी मिळेल. मुलांची प्रगती होईल. तब्येत उत्तम राहील.

कन्या –
अडचणीत आलेले काम करण्याचा प्रयत्न करा. कायद्याच्या बाबतीत यश मिळेल. खर्च कराल.

तूळ –
घरात आनंदी वातावरण राहील. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात आळस करू नका. वरिष्ठ मोठे काम देतील.

वृश्चिक –
सरकारदरबारची कामे करून घ्या. धंद्यासाठी मालाची खरेदी आजच करा. व्यवहारात सावध रहा.

धनु –
थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात फायदा होईल.

मकर –
नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. दौरा करावा लागेल. घरापासून दूर जाण्याची वेळ येईल. यश मिळेल.

कुंभ –
शेजार्‍याबरोबर किरकोळ कारणाने वादविवाद होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. धावपळ, दगदग होईल.

मीन –
आजचे काम उद्यावर टाकू नका. खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसाही मिळेल. पदाधिकार मिळेल. यश मिळेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!