हरतालिका पूजेचा ‘हा’ दुर्मिळ योग, ‘या’ शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास बंद नशिब उघडेल !!
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज ३० ऑगस्ट हरतालिका तीज व्रत केले जाते. निर्जला व्रत असल्यामुळे हे कठीण व्रतांपैकी एक आहे. या दिवशी महिला व मुली निर्जला व्रत करतात. हे व्रत करवा चौथ व्रतापेक्षा कठीण आहे, कारण दुसऱ्या दिवशी पारण केले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हे व्रत केले जाते.
तर या वर्षी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील उदयतिथीच्या आधारे पाहिले तर हरतालिका तीज ३० ऑगस्टला आहे. तीज व्रत हस्त आणि चित्रा नक्षत्रात ठेवण्यात येणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलींना चांगल्या वरासाठी प्रार्थना करतात.
विवाहित स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी, संततीप्राप्तीसाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका तीजचे व्रत करतात. हरितालिका तीज व्रत २०२२ च्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात, ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर अविवाहित मुलीही हे व्रत ठेवतात.
हरतालिका तीज पूजा मुहूर्त २०२२ : या दिवशी हरतालिका तीजचे व्रत करणाऱ्या स्त्रिया सकाळी ०५.२० ते ०८.५९ या वेळेत भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करू शकतात. हरतालिका तीजच्या सकाळच्या पूजेसाठी हा शुभ काळ आहे.
हरतालिका तृतीयेचा शुभ योग : हरतालिका तृतीया ३० ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी खूप शुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये पूजा केल्याने व्यक्तीला चांगले फळ मिळते अशी मान्यता आहे. हरतालिका तीजचा शुभ योग दुपारी १:४ वाजता सुरू होईल आणि ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२.०४ पर्यंत राहील. या योगात भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो. याशिवाय हरतालिका तीजला हस्त नक्षत्रही असेल. शास्त्रात हस्त नक्षत्र अत्यंत शुभ मानले गेले आहे. हस्त नक्षत्रात ५ नक्षत्रे आशीर्वादाच्या मुद्रेत दिसतात. अखंड सौभाग्य आणि परिपूर्ण वर मिळण्यासाठी या नक्षत्रात पूजा केल्यास ते अधिक फलदायी मानले जाते.
हरितालिका तृतीयाचे महत्व
विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली चांगला वर मिळावा यासाठी हरतालिकेचा उपवास करतात. या दिवशी उपवास केल्याने देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते. हे व्रत केल्याने महिलांना अखंड भाग्याचे वरदान मिळते. तसेच हरतालिका तृतीयाचे व्रत केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि वैवाहिक जीवनातील समस्याही संपतात अशी मान्यत आहे.