देवीची ओटी कोणी व वर्षातून किती वेळेस भरावी?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वर्षातून कितीदा कुलदेवीची किंवा कोणत्याही देवीची ओटी कशी आणि कोणत्या प्रकारे भरावी. प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरायलाच पाहिजे. देवीची ओटी केव्हा व कशी आणि कोणत्या ठिकाणी व कोणी भरावी, देवीची ओटी आपल्या देवीचे स्थान असेल त्या स्थानावर जाऊन भरणे खूप चांगले असते. मात्र ज्यांना मूळ स्थानावर जाऊन ओटी भरणे शक्य नाही, ते घरी देखील देवीची ओटी भरू शकता.
ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जातो. त्यावेळी त्या ठिकाणी ओटी भरायचीच आहे. मूळस्थानावर जर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच देवीची ओटी भरू शकता. जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटो समोर किंवा मूर्ती समोर आपण कुलदेवीची ओटी भरू शकता.
आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायला पाहिजे. आपल्या घरामध्ये कोणत्याही देवीचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतो लक्ष्मी मातेची ओटी भरली तरी चालते. देवींची ओटी देवींच्या खास वारादिवशी आपण भरू शकता. जसे की वर्षातून दोन नवरात्री येतात. एक म्हणजे चैत्र नवरात्रि. दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री अशाप्रकारे दोन वर्षातून नवरात्री येतात. नवरात्रीमध्ये नऊ दिवस येत असतात या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका वारी आपण देवीची ओटी भरू शकता. आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ गोष्ट घडत असेल, शुभ कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील आपण देवीची ओटी भरू शकता. घरामध्ये एखादे लग्नकार्य असेल तर देवीला आमंत्रण देऊन घरी बोलवून देवीची ओटी भरता येते.
दिवाळी किंवा इतर कोणतेही सणवार असतील, तर त्या वारी देखील आपण देवीची ओटी भरू शकता. आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील देवीची ओटी भरू शकता. जसे की, नोकरी लागणे, घर बांधून होणे, व्यवसायात, धंद्यामध्ये बरकत होणे, वंश वाढीस लागणे. अशा कोणत्याही मनातली इच्छा असते. त्या पूर्ण झाल्यानंतर आपण देवीची ओटी भरू शकता. देवीची ओटी भरण्यासाठी साडी ब्लाउज पीस तांदूळ किंवा गहू कोणतेही एक घेतले तरी चालते. हे सर्व देवी समोर ठेवून ज्या पद्धतीने आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो. त्या पद्धतीने देवीची ओटी देखील भरायची आहे. देवीची ओटी कोणी भरावी. तर देवीची ओटी विवाहित स्त्रियांनी भरायची आहे.