सावदा येथील महादेव मंदिरात महारुद्र अभिषेक व पूजन उत्साहात..!
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l येथील पाताळगंगा नदी च्या काठावर बसलेले प्राचीन जागृती देवस्थान म्हणून इतिहास असलेले महादेव मंदिर असून त्याचा जिर्णोध्रर हा शंकराचे देवालय लिंगायत ट्रस्ट कोष्टी पंच याच्या माध्यमातून मार्गशीर्ष महिन्यात १३ डिसेंबर १९९९ मध्ये करण्यात आला होता . महाशिवरात्रदिनाचे अवचित्य साधून सामूहिक रुद्राभिषेक दि २६ रोजी सकाळी ९ वाजता सोनजी लक्ष्मण अत्रे पुरोहित याच्या मधुर स्वराने मंदिरात महारुद्र अभिषेक व पूजन करण्यात आले तसेच प्रसादीचे आयोजन करण्याचे आले आहे.
प्रसंगी मंदिर गाभाऱ्यामध्ये गणेश कोष्टी , सुभाष बारघरे, सुरेश बारघरे, हरिभाऊ बेंडाळे यांनी सपत्नीक रुद्राभिषेक व पूजन केले. तसेच मंदिराच्या प्रगणात १५ महिलांनी महादेवाची पिंड ताटात ठेवून अभिषेक व पूजन केले.
कोष्टी वाड्यातील मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले महादेव मंदिर हे प्राचीन असून जीर्णावस्थेत आल्याने तत्कालीन लिगायत कोष्टी पंच ( ट्रस्ट) यांनी लोकवर्गणीतून आर्थिकहात स्थानिक व परिसर व परप्रतात जाऊन मदतीचा हात घेतल्याने भव्यदिव्य असे मंदिरात व आतून मार्बल चा वापर करून बांधकाम उभारण्यात आले आहे . मंदिरात गणपती, शंकर पार्वती, शालिग्राम महादेव पिंड व मंदिरासमोर नंदीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे महाशिवरात्र निमित्य प्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने रात्री पर्यंत महादेव भक्तगणांची मोठी उपस्थिती होती.