भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

Video| महाविकास आघाडीकडून अधिकारी मॅनेज– अत्तरदे यांचा खळबळजनक आरोप

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज भाजप नेते नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. त्यांची पत्नी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांचा अर्ज रद्द करण्यात आला असून अपात्र होणार अर्ज मंजूर करण्यासाठी ५० हजाराची लाच अधिकार्‍यांनी आपल्याला मागितल्याचा व महाविकास आघाडीकडून अधिकारी मॅनेज असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मुद्दाम टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या या आरोपाने आश्चर्य व्यक्त होत आहे, माधुरी अत्तरदे आणि चंद्रशेखर अत्तरदे यांनी थेट व जाहीर आरोप केल्याने ही प्रशासनाची काळी बाजू समोर आल्याचे बोलले जात आहे आता या वादात जिल्हाधिकारी काही हस्तक्षेप करतील का , हे महत्वाचे ठरणार आहे या निवडणूक प्रक्रियेवर जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांचा दबाव आहे असा जाहीर आरोप अत्तरदे यांनी केल्याने या वादाचे गांभीर्य वाढले आहे. आता आम्ही हायकोर्टात जाऊ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागू असेही त्यांनी सांगितले .

राजकारण्यांनी कीड लावलेली ही निवडणूक प्रक्रिया असू प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी आम्ही कोर्टात करणार आहोत सर्व २८० उमेदवारांच्या नावांची यादीही आम्हाला देण्यास अधिकारी नकार देत असल्याने आम्ही दिवसभर ठिय्या मांडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी चंद्रशखर अत्तरदे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आरोप करीत अत्यंत संतापात बिडवई अत्यंत भ्रष्टाचारी असल्याचे सांगितले आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आम्ही येथून हटणार नाही असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!