रावेर तालुक्यातील चिनावल, निंभोरा, मस्कावद, ऐनपूर सह ४१ ग्रामपंचायतींवर “महिलाराज”
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी नुकतेच आरक्षण काढण्यात आले. त्यात १३ अनुसूचित जाती , ११ अनुसूचित जमाती, १५ ना. मा. प्र. तर ४३ सर्वसाधारण गटासाठी अशा एकूण ८२ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आले. त्या पैकी ४१ ग्रामपंचायत महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. म्हणजेच रावेर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर ” महिलाराज” राहणार.
तहसील कार्यालयात दिनांक २१ एप्रिल रोजी प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळ अधिकारी विठोबा पाटील, सचिन पाटील, यासिन तडवी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात ८२ पैकी ४१ महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या पैकी काही ग्रामपंचायतींवर सध्या महिला आरक्षण आहे. त्यांना यातून वगळण्यात आले आहे.
सरपंच पदासाठी महिला आरक्षण या प्रमाणे –
अनुसूचित जाती महिला आरक्षण : २
पाडले खुर्द(महिला), खानापूर, -महिला
अनुसूचित जमाती महिला आरक्षण – ६. चिनावल (महिला),भोर (महिला), सुदगाव (महिला), दोधे (महिला), थेरोळे (महिला), वाघोड (महिला)
नामाप्र सरपंच महिला आरक्षण – ८
उटखेडा (महिला), सुनोदा (महिला), अजनाड-चोरवड (महिला), विवरे बुद्रुक, (महिला), रणगाव (महिला), खिर्डी खुर्द, (महिला), वाघाडी (महिला), अजंदे(महिला)
सर्वसाधारण महिला सरपंच – २२
रेंभोटा (महिला), पुरी-गोलवाडा (महिला), गाते (महिला), कोचुर खुर्द (महिला), गौरखेडा(महिला), रायपुर(महिला), कोळोदे (महिला), नांदूरखेडा( महिला), सावखेडा खुर्द (महिला), विटवे(महिला), निंबोल(महिला), अंदलवाडी (महिला), ऐनपूर (महिला), उदळी खुर्द( महिला) शिंगाडी (महिला), मोरगाव खुर्द( महिला), निंभोरासीम (महिला), शिंदखेडा( महिला), मस्कावद खुर्द ( महिला), मोरगाव बुद्रुक (महिला), निंभोरा बुद्रुक( महिला), धुरखेडा (महिला)