ग्रामपंचायतींवर “महिलाराज” यावल तालुक्यात ३२ महिला “सरपंच” पदावर विराजमान होणार
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |यावल तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात यावल तहसील कार्यालयात पार पडलेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत ३२ ग्रामपंचायतीं च्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती जाणार आहेत. ३२ ग्रामपंचायतींवर “महिलाराज ” राहणार आहे.
या वेळी एकूण ६३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये अनुसूचित जाती – ८, अनुसूचित जमाती -२१, इतर मागासवर्गीय जी २ , व सर्वसाधारण जागेसाठी ३२ अशा एकूण ६३ सरपंच जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यातून ३२ सरपंच पदाच्या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
ही आरक्षण प्रक्रिया फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर आणि निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
आरक्षण हे पुढील प्रमाणे असणार –
१ ) बोरावल बु॥ अनु.जमाती स्त्री, २ ) मोहराळे अनु .जमाती स्री, ३ )वढोदा प्र .यावल अनु . जमाती स्त्री , ४ )बोरखेडा बु॥ अनु .जमाती स्त्री ,५ )) वड्री अनु .जमाती स्त्री ,६ ) मनवेल अनु जमाती स्त्री ,७) अनु.जमाती ,कोसगाव अनु.जमाती स्त्री ८ ) मारूळ अनु.जमाती स्त्री, ९ ) थोरगव्हाण अनु. जमाती स्त्री ,१०) बामणोद अनु . जमाती स्त्री, ,११ ) चिखली बु॥ अनु. जमाती स्त्री , १२) सांगवी बु॥ अनु.जमाती स्त्री, १३ ) अट्रावल अनु.जाती स्त्री,१४ ) कोळवद अनु.जाती स्त्री, १५ ) म्हैसवाडी अनु.जाती स्त्री , १६ ) वढोदा प्रगणे सावदा ना. मा .प्रा स्त्री, १७ ) न्हावी प्र . अडावद सर्वसाधारण स्त्री,१८ ) चंचाळे सर्वसाधारण स्त्रि, १९) कासवे सर्वसाधारण स्त्री २०) आडगाव सर्व साधारण स्त्री, २१ ) गिरडगाव सर्व साधारण स्त्री , २२ ) शिरसाड सर्व साधारण स्त्री ,२३ ) दुसखेडा सर्वसाधारण स्त्री , २४ ) कोरपावली सर्वसाधारण स्त्री , २५)अंजाळे सर्वसाधारण स्त्री २६) डोंगर कठोरा सर्वसाधारण स्त्री , २७ ) उंटावद सर्वसाधारण स्त्री २८ ) साकळी सर्वसाधारण स्त्री २९ ) भालोद सर्वसाधारण स्त्री , ३० ) दहिगाव सर्वसाधारण स्त्री , ३२ ) डोणगाव सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षण निश्चित झाले आहे.