भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमजळगाव

गुटखा तस्करावर मोठी कारवाई, कंटेनर सह ७३ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित गुटखा राजकारणावर मोठी कारवाई करण्यात आली. पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित गुटख्याने भरलेला कंटेनर पाठलाग करून पकडण्यात आल्याने पाळधी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल ७३ लाख २२ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक वृत्त असे की, महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर जाणार असल्याची माहिती पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता त्यानुसार पाळत ठेवण्यात आली. कंटेनर येताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने न थांबता कंटेनर पुढे नेल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला. अखेर एरंडोल तालुक्यातील सावदे शिवारात हा कंटेनर पकडण्यात पोलिसांना यश आले. कंटेनर ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणण्यात आला. तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळून आले. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यात १२८ गोण्या प्रतिबंधित गुटखा आढळून आला असून त्याची अंदाजे किंमत ४८ लाख २२ हजार २६४ रुपये आहे. यासह सुमारे २५ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ७३ लाख २२ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रदीप भाटू पाटील (वय ४९) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. गुटख्याची कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, कारवाई होताच पाळधी परिसरातील अवैध धंदे तत्काळ बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ही कारवाई पाळधी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम सुरवाडे, योगेश सोनवणे, वसंत निकम, संदीप खंडारे, रवींद्र चौधरी, मोहन पाटील, रमेश सूर्यवंशी, भारत पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतूल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, रवी कापडणे यांच्या पथकाने केली. या वेळी धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!