विधानपरिषद निवडणूक : ज्या आमदारांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर – नाना पटोलेंचा इशारा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकित काँग्रेसचे आठ आमदार फुटल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच या फुटीर आमदारांवर कारवाईचा इशारा दिलेला आहे. येत्या १९ जुलै रोजी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या ८ आमदारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मते फुटली होती. निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले यांनी मान्य केलं आहे. काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे. वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आले आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत.ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्यांना सोडल जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. किती लोक फुटले याचा आकडा येईल. आमचा सगळ्या आमदारांवर विश्वास होता, पण ह्या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला. आम्ही जी स्टेटर्जी केली, त्याला देखील हे लोक वागले नाहीत. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय.
काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत. याचं बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या ८ आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.विधानपरिषद निवडणुकीत ज्या ८ आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केले यापैकी काही आमदारांनी भाजपला तर काहींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केल्याचे पाहायला मिळाले.