मोठी कारवाई : आठ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बेकायदेशीर मद्यसाठा पीकअप
वाहतूक करणाऱ्या वाहनातून २ लाख ६३ हजार ५२० रूपयांचा मद्यसाठा शिरपूर कडून चाळीसगाव कडे जात असताना चाळीसगाव चौफुली वर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला .
महिंद्रा पीकअप वाहन क्र. एम. एच . ०४ जी एफ ९६७९ द्वारे मद्यसाठ्याची अवैध बेकायदेशीर वाहतूक शिरपूर कडून चाळीसगाव चौफुली मार्गे चाळीसगाव कडे होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले.
पथकाने दि .४ रोजी ६ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव चौफुली वर ठरल्यानुसार वाहन येताच वाहनाला अडवून वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनातून २ लाख ६३ हजार ५२० रुपये किमतीचा मद्यासाठा जप्त केला. तसेच ४ लाख रुपये किमतीच्या वाहनासह चालक हकीम याकूब पटेल, ,वय ३३ वर्ष राहणार प्लॉट न. २५१/२ . एम. आय. डी. सी. सेक्टर, तोल काट्या जवळ, साईनगर, जळगाव.यास ताब्यात घेतले. या बाबत चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलिस अधीक्षक किशोर कले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, संतोष हिरे, पवन गवळी, देवेंद्र ठाकूर आदींनी केली.
