मोठी कारवाई : मुक्ताईनगर मध्ये १० टायरी ट्रक मधून २ कोटी ९ लाखांचा गुटखा जप्त
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूरनाड फाटा येथे १० टायरी ट्रक मधून सुमारे २ कोटी ८ लाख ८२ हजार ५४० रूपयांचा ट्रक सह गुटखा पकडल्याने गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूरनाड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील psi दत्तात्रय पोटे, पोलीस हवालदार दीपक माळी, मुरलीधर चुडामन धनगर, सचिन रमेश पोळ मुक्ताईनगर पोलीस स्टॉप आशांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एक तपकिरी रंगाचा १० टायरी ट्रक क्रमांक NL 01 AJ.1725 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेली सुगंधी तंबाखू गुटखा वाहतूक करीत आहे अशी माहिती मिळाल्याने पुरणार फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना वर नमूद क्रमांकाचा ट्रक हा मिळून आला.
ट्रक ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली असता ट्रक मधून खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्यांमध्ये प्रतिबंधित करण्यात आलेला गुटखा वाहतूक करताना आरोपी सक्रूरला अब्दुल अजीज, कैप फारुख खान, व तारीख लोकमान खान सर्व रा. मेवात जिल्हा नुहू राज्य हरियाणा यांच्या ताब्यातील वाहनातून पिवळ्या रंगाच्या १०२ गोण्या मध्ये Sk नावाचा गुटखा तसेच पांढऱ्या रंगाच्या ३२ गोण्यांमध्ये Royal 1000 गुटका अशा एकूण १३४ गोण्यांमध्ये तसेच दहा टायर ट्रक असा एकूण २ कोटी ८ लाख ८२ हजार ५८० रुपयाचा मुद्देमाल नमूद आरोपी यांच्याकडून मिळून आला.
त्या नुसार त्यांचे विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर ४१९/ २०२४ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२७४,२७५,३(५)२२३ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ कलम २७(३),(d), २७ (३),(e), ५९, २६ (२),(v) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्या असून सदर कार्यवाही ही जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव बबनराव आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांचे आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोलीस निलेश गोसावी यांच्याकडे देण्यात आला आहे