चुलत भावाने व सख्या मुलीने केला बापाचा खून; मलकापूर मध्ये धक्कादायक प्रकार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मलकापूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। काल
दि.08-092021 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घरातील वादातून चुलत भावा समवेत मुलीने केला बापाचा खून केला, हा धक्कादायक प्रकार मलकापूर मध्ये घडला असून या मुळे सर्वत्र खडबड उडाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की स्थानिक सुभाष चंद्र बोस नगर मधील कुमारी वैष्णवी गुलाबराव रावणचौरे या मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसात तक्रार केली की तिची मोठी बहीण लक्ष्मी हिचे तीन वेळा लग्न झालेले असून ही सासरी भांडण करून माहेरी राहायला येणार होती परंतु ही गोष्ट मृतक गुलाबराव यांना आवडत नव्हते त्यामुळे त्यांनी तिला विरोध केला तू इथे राहू नको आमची बदनामी होईल आणखी दोन तीन मुली लग्नाच्या आहे त्यांचे लग्न होणार नाही तू तुझ्या सासरी किंवा इतर कुठेही रहा असे सांगितल्यानंतर तिच्या चुलत भाऊ प्रकाश यांला त्यांचा राग आला आणि या दोघांनी मिळून मृतक गुलाबराव रावणचौरे यांना घरामध्ये घुसून सुरीने सपासप वार करून जीवे मारले या घटनेची माहिती पोलिसांना माहिती पडताच पी आय काटकर, पी एस आय विश्वजीत ठाकुर, पी एस आय ठाकरे, पो.कॉ आनंद माने, पो.कॉ राठोड, पो.कॉ दुर्गसिंह सोळंके, पो.कॉ. नाफडे, ए पी आय सुखदेव भोरकडे, ईश्वर वाघ, सलीम बर्डे, अनिल डागोर यांनी घटनास्थळ गाठले पोलिसांनी पंचनामा करून आरोपीविरुद्ध कलम 302/34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पीआय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बोराडे करत आहे