शासनाचा अन्यायकारक निर्णय रद्द करा,आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मलकापुर,संकेत पवार। महाराष्ट्र शासनाने मा.हरदास समितीचा अन्यायकारक अहवाल स्वीकारून शासनाने दि:-7 जून 2021 रोजी शासन निर्णय पारित केलेला आहे. सदर निर्णय समाजाच्या दृष्टीने अंत्यत घातक असून,आदिवासी कोळी ढोर, टोकरे कोळी,कोळी महादेव,कोळी मल्हार व इतर यांचे अस्तित्व संपवण्याचा डाव षडयंत्र पूर्वक रचला जात आहे,तो काळा जि. आर.रद्द व्हावा म्हणून मा.उप विभागीय अधिकारी, मलकापूर यांना आदिवासी कोळी समाज समन्वय समिती तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी जिल्हा समन्वयक श्री डी एस सपकाळ, श्री सुभाष बावस्कार, श्री स्वप्निल धाडे,श्री संतोष बाम्हंदे श्री सुरेश उंडे, श्री निवृत्ती कहाते,पत्रकार श्री कैलासभाऊ कोळी,श्री विजय सोनोने, श्री कृष्णा दोडे, श्री मरू न्हावकर, श्री विठ्ठल तायडे,श्री अनिकेत धाडे, श्री श्रीकृष्ण तायडे, श्री मधुकर धाडे यांचेसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.