न्यूड फोटो व्हायरल करुन तुझ्या आई- बाबांना दाखवेन,धमकी देत वारंवार अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मलकापूर,जि.बुलडाणा, प्रतिनिधी : शहरातील एका १५ वर्षीय मुलीचे न्यूड फोटो काढून ते व्हायरल करण्याच्या धमकीने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये एका १५ वर्षीय मुलीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमार्फत फसवून तिचे न्यूड फोटो काढण्यात आले. ते फोटो व्हायरल करुन तुझ्या आई – बाबांना दाखवेन, अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. त्या मुलीला वाटेल तिथे बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने तक्रार दिल्यावर आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली.
आरोपी 30 वर्षीय भूषण गजानन बोरसे या नराधमाच्या धमक्यांना बळी पडून वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीच्या अब्रूची लचके तोडली गेली वेळोवळी होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने हकीकत घरी सांगितली.पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कलम 376(2) (N), 354 आ (i), 506, 34 आयपीसी सहकलम 4 बा.लै.अ.सं. अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंदवला.