भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यबुलढाणा

धक्कादायक ; रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात चक्क पाणी भरून विक्री !
पैशांच्या हव्यासापोटी रुग्णाच्या जीवाशी खेळ,

Monday To Monday NewsNetwork।

मलकापूर(प्रतिनिधी)। राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनतेसह प्रशासन हैराण झाले आहे, राज्यावर कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा कोलमडलेली असतानाही या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशाही परिस्थितीत काही जण पैशाच्या हव्यासापोटी काळाबाजार करत आहे. रुग्णालयाचा वॉर्ड बॉयच चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला .

रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या व आहेतही त्या अनुषंगाने बुलडाणा गुन्हे शाखेच्या वतीने शहरात रेमडेसीवीर इंजेक्शन्सची काळाबाजारी करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली असून हे तिघे जण बुलडाणा शहरातील नामांकित डॉ. मेहेत्रे व डॉ लद्दड यांच्या हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय म्हणून काम करत आहेत.रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करत असताना पकडण्यात आलेल्या तीन जणांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. १५ ते २० हजार रुपयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.या हॉस्पिटलमध्ये वापरल्या गेलेले रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.त्यामुळे या पाण्याने भरलेल्या रेमडेसीवीरच्या कुप्या किती जणांना विकल्या व त्याचा किती रुग्णांवर वापर करण्यात आला आहे, हे ही पोलीस तपासत उघड होणार आहे,एकीकडे रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक धडपड करीत असतात वाटेल तितका पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असते आणि ह्याच संधीचा फायदा घेत लालसेपोटी रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा घृणास्पद प्रकार केलां जात आहे ह्या संपूर्ण धिक्कारार्थ प्रकारामुळे कोरोना काळात माणुसकी मेली की काय ? असा प्रश्न निर्माण केला जात असून या बाबात मात्र सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!